बंद

    मासेमारी साधनांच्या खरेदीवर अर्थसहाय्य

    • तारीख : 28/09/2010 -

    शासन निर्णय दि

    28/09/2010

    सागरी मत्स्यव्यवसाय

    तयार मासेमारी जाळी खरेदीवर अनुदान

    सागरी क्षेत्रातील मासेमारी नौकांवर वापरण्यात येणाऱ्या नायलॉन व मोनोफिलामेंट तयार जाळी खरेदीवर खालीलप्रमाणे अनुदान अनुज्ञेय राहील.

    तयार मासेमारी जाळी खरेदीवर अनुदान
    अ.क्र. बाब अनुज्ञेय अनुदान
    1 3 टनावरील प्रत्येक मासेमारी नौकेस, प्रती वर्ष 200 कि.ग्रॅ.पर्यंत तयार जाळयांच्या किमंतीच्या 50 टक्के पेक्षा जास्त नाही इतके अनुदान देय राहील. जाळयाच्या किमतीची कमाल मर्यादा प्रती कि.ग्रॅ.रु.800/-इतकी राहील.
    2 3 टनावरील प्रत्येक मासेमारी नौकेस, प्रती वर्ष 100 कि.ग्रॅ.पर्यंत तयार जाळयांच्या किमंतीच्या 50 टक्के पेक्षा जास्त नाही इतके अनुदान देय राहील. जाळयाच्या किमतीची कमाल मर्यादा प्रती कि.ग्रॅ.रु.800/-इतकी राहील.
    3 रांपण संघाच्या प्रत्येक सभासदाला रांपणीच्या तयार जाळयांवर प्रतिवर्षी 50 कि.ग्रॅ.पर्यंत तयार जाळयांच्या किमंतीच्या 50 टक्के पेक्षा जास्त नाही इतके अनुदान देय राहील. जाळयाच्या किमतीची कमाल मर्यादा प्रती कि.ग्रॅ.रु.800/-इतकी राहील.

    बिगर यांत्रिक नौका

    या बाबतीत शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय घेतलेला आहे.

    1. लहान मच्छिमारांना किवा रापणकारांना 10 टनापर्यंतची, लाकडी/फायबर नौका, बांधणी/तयार नौका खरेदी करण्यासाठी सध्याच्या प्रचलित दराने रु.1,00,000/-(रुपये एक लाख फक्त) पर्यंतच्या देण्यात येणाऱ्या अनुदानाची मर्यादा वाढवून रुपये 2,50,000/-(रुपये दोन लाख पन्नास हजार फक्त) पर्यंत करण्यात येत आहे.
    2. लहान मच्छिमारांना किंवा रापणकारांना 10 टनापर्यंतची, लाकडी/फायबर नौका, बांधणी/तयार नौका खरेदी करण्यासाठी प्रकल्प किमंत रु. 5 लक्ष पर्यंत खर्चाच्या 50 टक्के अथवा रु.2,50,000/- च्या देण्यात येणाऱ्या अनुदानाची मर्यादा वाढवून रुपये 2,50,000/-(रुपये दोन लाख पन्नास हजार फक्त) यापैकी जे कमी असेल तेवढे अनुदान अनुज्ञेय राहील.

    भूजल मत्स्यव्यवसाय

    तयार मासेमारी जाळी खरेदीवर अनुदान
    अ.क्र. बाब अनुज्ञेय अनुदान
    1 भूजलाशयीन मत्स्यव्यवसाया अंतर्गत नायलॉन/मोनोफिलामेंट तयार जाळी खरेदीवर
    प्रती सभासद/वैयक्तिक मच्छीमारास 20 कि.ग्रॅ.पर्यंत
    50% अनुदान देय राहील.
    जाळयाच्या किंमतीची कमाल मर्यादा प्रती कि.ग्रॅ. रु.800/- राहील.

    बिगर यांत्रिक नौका

    या बाबतीत शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय घेतलेला आहे.

    भूजल क्षेत्रात लहान आकाराच्या होड्या वापरल्या जातात. बिगर यांत्रिक
    नौकेासाठी खालीलप्रमाणे अनुदान प्रस्तावित करण्यात येत आहे.
    अ.क्र. नौकेचा प्रकार प्रकल्प किंमत (रु.) अनुज्ञेय अनुदान
    1 लाकडी नौका 60,000/- प्रकल्प किमतीच्या 50% अथवा रु.30,000/-
    (रुपये तीस हजार फक्त) यापैकी जे कमी असेल तेवढे अनुदान देय राहील.
    2 पत्रा नौका 30,000/- प्रकल्प किमतीच्या 50% अथवा रु.15,000/-
    (रुपये पंधरा हजार फक्त) यापैकी जे कमी असेल तेवढे अनुदान देय राहील.
    3 फायबर नौका 1,20,000/- प्रकल्प किमतीच्या 50% अथवा रु.60,000/-
    (रुपये साठ हजार फक्त) यापैकी जे कमी असेल तेवढे अनुदान देय राहील.

    लाभार्थी:

    मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेचे सभासद

    फायदे:

    मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेचे सभासद

    अर्ज कसा करावा

    सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यसाय कार्यालय येथे अर्ज करावा