मच्छीमार युवकांना प्रशिक्षण
लाभार्थी:
मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेचे सभासद
फायदे:
शासन निर्णय क्रमांक मत्स्यशि-1082/4591/12-पदुम, दि.04/09/1982 अन्वये मच्छिमार युवकांना प्रशिक्षण देण्याची योजना सुरु करण्यात आली. या केंद्रात मासेमारीचे अत्याधुनिक ज्ञान, त्याचप्रमाणे डिझेल इंजिन व मासेमारी बोटीची निगा कशी राखावी याबाबत प्रशिक्षण देण्यात येते. मासेमारीबाबत आधुनिक तंत्राचे किमान मुलभूत प्रशिक्षण देणे हा देखिल या प्रशिक्षणाचा हेतू आहे.
अर्ज कसा करावा
सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यसाय कार्यालय