प्रधानमंत्री मत्स्यकिसन समृद्धी सह योजना
मत्स्यव्यवसाय क्षेत्राचे औपचारिकीकरण
राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय डिजिटल मंच (NFDP) आणि मोबाईल अॅप तयार करून, नोंदणी व लाभांसाठी अर्ज सादर करणे NFDP च्या विकास आणि देखभालीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) चा समावेश स्वयं-नोंदणी किंवा CSC सहाय्यित कार्य-आधारित मच्छीमारांच्या ओळखीसाठी नोंदणी
मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांचे बळकटीकरण
मत्स्य सहकारी संस्थेस रु. २.00 लाखांचे आर्थिक सहाय्य
- निवडलेल्या मत्स्य सहकारी संस्थांचे अंतर विश्लेषण आणि योग्य व्यवसाय योजनेची तयारी, मार्गदर्शन व २.५% संस्थात्मक शुल्क समाविष्ट- रू. 1,00,000
- गरजेनुसार आर्थिक सहाय्य उदा. कार्यालयीन गरजा, कार्यालयीन फर्निचर आणि उपकरणे इ.- रु. 90,000
- निवडलेल्या सहकारी संस्थांचे प्रशिक्षण आणि क्षमता विकास- रु. 10,000
संस्थात्मक वित्तपुरवठ्याचे सुलभीकरण
बँकेला प्रकल्प अहवालाची आवश्यकता असल्यास रु. ५,००० निश्चित रक्कम किंवा खालील कर्ज श्रेणीप्रमाणे शुल्क लागू
अ. क्र. | कर्ज श्रेणी | Success fee |
---|---|---|
1 | रु. 5 लाख पर्यंत | रु. 3,000 |
2 | रु. 5 लाख ते रु. 10 लाख | रु. 4,000 |
3 | रु.10 लाख ते रु. 50 लाख | रु. 5,000 |
मत्स्यसंवर्धन विमा स्वीकारण्यास प्रोत्साहन
मत्स्यसंवर्धन तळी
प्रोत्साहन
विमा प्रीमियमच्या ४०% (मर्यादा: रु.२५,००० प्रति हेक्टर जल क्षेत्र) कमाल प्रोत्साहन: रु.१,००,००० पर्यंत ०४ हेक्टरसाठी (१ हेक्टरपेक्षा कमी जल क्षेत्रासाठी: प्रमाणानुसार प्रोत्साहन देय)
इतर मत्स्यसंवर्धन प्रणाली
इतर प्रणाली: पिंजरा मत्स्यसंवर्धन, RAS, बायोफ्लॉक, Raceway, इ. (कमाल युनिट आकार: १८०० घन मीटर (m³))
- प्रोत्साहन: प्रीमियमच्या ४०%
- कमाल प्रोत्साहन: रु.1.00 लाख
मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील मूल्यसाखळी कार्यक्षमतेत सुधारणा करण्यासाठी सूक्ष्म उद्योगांना समर्थन देणे
सर्वसाधारण प्रवर्ग
- एकूण गुंतवणुकीच्या २५% किंवा रु.३५.00 लाख (जे कमी असेल ते लागू)
- अ.जा., अ.ज. आणि महिला मालकीचे सूक्ष्मउद्योग: एकूण गुंतवणुकीच्या ३५% किंवा रु. ४५ लाख (जे कमी असेल ते लागू)
- VLO आणि SHG संघटना, FFPOs, सहकारी संस्था : एकूण गुंतवणुकीच्या ३५% किंवा रु. २०० लाख (जे कमी असेल ते लागू)
- Relative Weights of Performance Criteria : नवीन रोजगार निर्मिती: ५०% आणि नवीन यंत्रसामग्री वरील गुंतवणूक: ५०%
- रोजगार निर्मिती व देखभालीसाठी प्रोत्साहनात्मक अनुदान: प्रत्येक महिला कर्मचारीसाठी: रु. १५,०००/वर्ष आणि प्रत्येक पुरुष कर्मचारीसाठी : रु. १०,०००/वर्ष
मासे आणि मत्स्य उत्पादनांच्या सुरक्षितता व गुणवत्ता हमी प्रणालींचा स्वीकार आणि विस्तार
मासे उत्पादन सुरक्षितता आणि गुणवत्ता हमी प्रणालींसाठी केलेल्या गुंतवणुकीसाठी तसेच सूक्ष्म व लघु उद्योगांद्वारे रोजगार निर्मिती व देखभालीसाठी प्रोत्साहनात्मक अनुदान
शोध प्रणाली प्रकल्प (Traceability Projects)
- विशिष्ट मूल्यसाखळीसाठी शोध प्रणाली – प्रति प्रकल्प रु. १०.00 कोटींपर्यंत
- विशिष्ट मूल्यसाखळीच्या ठराविक विभागासाठी शोध प्रणाली- प्रति प्रकल्प रु. ०५.00 कोटींपर्यंत
- विशिष्ट उपक्रमाच्या मूल्यसाखळीसाठी शोध प्रणालीवर पायलट प्रकल्प- प्रति प्रकल्प रु. ३०.00 लाखांपर्यंत
- मत्स्यव्यवसाय आणि मत्स्यसंवर्धनातील विविध मूल्यसाखळ्यांमध्ये शोध प्रणालीच्या अंमलबजावनीची व्यवहार्यता आणि आवश्यकतेचा अंदाज घेण्यासाठी पायलट अभ्यास – प्रति प्रकल्प रु. १०.00 लाखांपर्यंत
- लाभार्थीं निवड
- जिल्हा कार्यालयाकडे अर्ज सादर
लाभार्थी:
वर नमूद केल्याप्रमाणे
फायदे:
वर नमूद केल्याप्रमाणे
अर्ज कसा करावा
संबंधित विभागाशी संपर्क साधा