बंद

    सतत विचारले जाणारे प्रश्न

    1. गोडया पाण्यातील मत्स्यसंवर्धन युक्त प्रमुख मासे कोणते?
    2. उत्तर : कटला, रोहू, मृगल, सायप्रिनस, पोशा कोळंबी इ.(फोटो लिंक)

    3. गोडया पाण्यातील मत्स्यबीज कोठे व केव्हा उपलब्ध होईल?
    4. उत्तर : राज्यातील शासकीय मत्स्यबीज उत्पादन केंद्र तसेच प्रमाणिकरण केलेल्या मत्स्यबीज उत्पादन केंद्र येथून मत्स्यबीज उपलब्ध होईल. भारतीय प्रमुख कार्य मत्स्यबीज उपलब्धतेचे मुख्य हंगाम माहे जुलै ते सप्टेंबर अखेर. (यादीची लिंक)

    5. गोडया पाण्यातील तलाव/ मत्स्यतळी यामधून अधिक मत्स्योत्पादनासाठी किफायतशीर मत्स्यबीज साठवणूकीचे प्रमाण किती?
    6. उत्तर : तलावात मत्स्यबोटुकली (50-60 मि.मि.) स्वरुपात प्रति हेक्टर 5000 नग, या प्रमाणात संचयन असावे.

    7. गोडया पाण्यातील तलाव/मत्स्यतळया मध्ये मासळी वाढीसाठी कोणते खाद्य वापरावे?
    8. उत्तर : तलाव/ मत्स्यतळयातील माशांच्या वजनाच्या प्रमाणात स्थानिक उपलब्धतेनुसार शेंगदाणा पेंड, भाताचा कोंडा तसेच कृत्रिम तयार मत्स्यखाद्य वापरावे.

    9. मत्स्यव्यवसाय विषयक प्रशिक्षण कोठे मिळू शकेल?
    10. उत्तर : मत्स्यव्यवसाय संबंधित संशोधन संस्था, मत्स्य महाविदयालय, समुद्र उत्पाद निर्यात विकास प्राधिकरण तसेच मत्स्य सेवा केंद्र या ठिकाणी प्रशिक्षण उपलब्ध आहे.

    11. निमखारे पाण्यातील मत्स्यसंवर्धन युक्त प्रजाती कोणती?
    12. उत्तर : जिताडा, टायगर कोळंबी, वेनामी कोळंबी, खेकडा (फोटो लिंक)

    13. मत्स्यव्यवसाय विषयक अनुदानाची योजना कोणती?
    14. उत्तर : प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना (फोटो लिंक)

    15. निमखारे/तटीय क्षेत्रात मत्स्य/कोळंबी संवर्धनासाठी नोंदणी कुठे करावे?
    16. उत्तर: तटीय जलकृषी प्राधिकरण, चेन्नई यांच्याकडे उपविभागीयस्तरीय/ जिल्हास्तरीय समितीमार्फत अर्ज करावे.

    17. जलाशय/तलाव यामध्ये पिंजरा मत्स्यसंवर्धनाची कोणती कार्यपध्दतीचा अवलंब करण्यात येतो?
    18. उत्तर : कृषि व पदुम विभाग यांच्या दि. 18.01.2023 च्या शासन निर्णयान्वये पिंजरा मत्स्यसंवर्धनाचे धोरण राबविण्यात येते. (शासन निर्णय लिंक)(फोटो लिंक)

    19. राज्याच्या सागरी जलधीक्षेत्र किती व या क्षेत्रातील मासेमारी नियमन कोणत्या कायदयान्वये करण्यात येते?
    20. उत्तर : महाराष्ट्र राज्याची सागरी जलधीक्षेत्र हे 12 सागरी मैल इतके आहे. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981, नियम 1982 तसेच महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन (सुधारणा) अधिनियम-2021 नुसार व या अंतर्गत निर्गमीत आदेश/ अधिसुचना याद्वारे मासेमारी नियमन करण्यात येते. (लिंक कायदा व नियम)

    21. सागरी मासेमारी बंदी कालावधी निश्चित करण्यात आला आहे काय ? असल्यास कालावधी
    22. उत्तर : होय. पश्चिम किनारपट्टीवर यांत्रिक मासेमारी नौकांसाठी दि.01 जून ते 31 जुलै (61 दिवस) मासेमारी बंदी कालावधी लागू करण्यात आलेला आहे.

    23. कोणत्या मांगूर प्रजाती संवर्धनास प्रतिबंध करण्यात आलेला आहे?
    24. उत्तर: आफ्रिकन कॅटफिश (क्लेरियास गॅरीपिनस) या मांगूर प्रजातीस प्रतिबंध करण्यात आले आहे.

    25. सागरी विषयक प्रशिक्षण कुठे उपलब्ध आहे?
    26. उत्तर : नौकेची इंजिन निगा, नौकानयन शास्त्र व मासेमारी साधने विषयी, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, सातपाटी, वसई, वर्सोवा, अलिबाग, रत्नागिरी व मालवण येथे सहा महिन्याचे प्रशिक्षण आयोजित केले आहे.

    27. महाराष्ट्र राज्याचा “राज्यमासा” कोणता?

    उत्तर : पापलेट (सरंगा) (चांदीचे पोम्फ्रेट)