राज्याच्या मत्स्यउत्पादनासाठी १० सूत्री कार्यक्रम
- पुढील 5 वर्षात मत्स्योत्पादनात भरीव वाढ करुन देशामध्ये पहिल्या 3 क्रमांकामध्ये येणे
- मत्स्यबीज उत्पादनामध्ये स्वावलंबन
- पर्यावरण संतुलनासह शास्वत मत्स्यपालन
- पायाभूत सुविधांचे बळकटीकरण
- मच्छिमारांचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचावणे
- स्वच्छ व प्रथिनयुक्त पोषक
- अन्नाचा पुरवठा
- परकीय चलनवृध्दी
- सहकार क्षेत्रास प्रोत्साहन
- ग्रामरोजगार निर्मिती
- मत्स्यव्यवसायाबाबत जनजागृती
मत्स्यव्यवसाय प्रगतीचे टप्पे
- सन १९४५ मध्ये स्वतंत्र मत्स्यव्यवसाय विभाग स्थापन.
- तारापोरवाला मत्स्यालयाची १९५१ मध्ये उभारणी
- खोपाली (जिल्हा रायगड) येथे १९५५ मध्ये पहिल्या मत्स्यबीज केंद्राची उभारणी.
- भारतीय प्रमुख कार्प माशांच्या प्रेरीत प्रजननामध्ये १९५७-५८ मध्ये पहिले यश.
- संयुक्त मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र १९५५ मध्ये सातपाटी येथे सुरु.
- सन १९६६-६७ मध्ये मासेमारी नौकांच्या यांत्रिकी करणास सुरवात.
- कोकण कृषी विद्यापीठांतर्गत १९८१ मध्ये रत्नागिरी येथे मत्स्य महाविदयालयाची सुरवात.
- वर्तुळाकार हॅचरीजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या उपाययोजनेतून सुधारित प्रेरित प्रजाननाद्वारे मत्स्यबीज उत्पादनात वाढ.
- दापचरी (जिल्हा ठाणे) येथे २००७-०८ मध्ये गोडया पाण्यातील कोळंबी बीज केंद्राची सुरवात.