निमखारे पाणी मत्स्यव्यवसाय
निमखारे पाणी मत्स्यव्यवसाय
महाराष्ट्र राज्यात एकुण 7 सागरी जिल्ह्ये आहेत. या सात जिल्ह्यातील मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यास समुद्र किनारा लाभाला असला तरी या क्षेत्रात निमखारे मत्स्य संवर्धनाकरीता वाव नाही. महाराष्ट्राच्या एकुण सागरी जिल्ह्यांचा विचार करीता मत्स्यसंवर्धनाकरीता शासकीय क्षेत्र 11358 हे. इतके तर खाजगी क्षेत्र 5767 हे. असे एकुण 17,125 हे. इतके खाजण क्षेत्र उपयुक्त आहेत. महाराष्ट्र राज्यातील एकुण खाजण क्षेत्र 80,000 हे. असुन, त्यापैकी वाटप झालेले शासकीय खाजण क्षेत्र 2,715.74 हे. इतके आहे. तसेच, वाटप करण्यात आलेल्या झालेले शासकीय खाजण क्षेत्रापैकी मत्स्य/ कोळंबी संवर्धनाखालील एकुण खाजण क्षेत्र 2,181.1 हे. इतके आहे. या बाबतची माहीती खालील प्रमाणे आहे.
| अ.क्र. | तपशील | एकूण क्षेत्र (हे.) |
|---|---|---|
| 1 | एकूण उपलब्ध खाजण जागा | 80,000.00 |
| 2 | मत्स्य/ कोळंबी संवर्धनासाठी उपयुक्त असलेली खाजण जागा क्षेत्र | 17,125.00 |
| अ. शासकीय खाजण क्षेत्र | 11,358.00 | |
| ब. खाजगी खाजण क्षेत्र | 5,767.00 | |
| 3 | वाटप झालेलं शासकीय खाजण क्षेत्र | 2,715.74 |
| 4 | अ. क्र. 3 पैकी मत्स्य/ कोळंबी संवर्धनासाठीतील शासकीय खाजण क्षेत्र | 1,359.08 |
| 5 | मत्स्य/ कोळंबी संवर्धनाखालील खाजगी खाजण क्षेत्र | 822.02 |
| 6 | एकूण मत्स्य/ कोळंबी संवर्धनाखालील क्षेत्र (4+5) | 2,181.1 |
| 7 | राज्याची एकूण कोळंबी बियांची मागणी (संख्या) | 19.88 (कोटीत) |
| 8 | एकूण निमखारे पाणी कोळंबी उत्पादन (मे. टन) | |
| अ. 2022-23 | 2,165.5 | |
| ब. 2023-24 | 2,532.0 |
निमखारे क्षेत्रात मुख्याव्य व्हेनामी व टायगर कोळंबी प्रजातींचे संवर्धन करण्यात येते. त्याच प्रमाणे जिताडा मासा, काळुंदर मासा व बोय मासा या माश्याच्या प्रजातीचे संवर्धन करण्यात येते. या करीता लागणारे कोळंबी बीज हे खाजगी कोळंबीबीज केंद्र (आंध्रप्रदेश, तमिळनाडु) येथुन आणले जाते. तसेच, मत्स्य बीज हे नैसगिक स्त्रोतातुन घेतले जाते.
महाराष्ट्र शासन व सीआयबीए सामंजस्य करार: दि.21.03.2023
भा. कृ. अनु. पा. – केंद्रीय खारा जलजीव पालन अनुसंधान संस्थान, चेन्नई (CIBA, Chennai) यांच्या समवेत मत्स्यव्यवसाय विभागाचा दि. 21 मार्च, 2023 रोजी सामंजस्य करार झाला आहे. तसेच,सीआयबीए, चेन्नई यांच्या मार्फत महाराष्ट्रातील निमखारेपाणी या क्षेत्रातील मत्स्यशेतीच्या विस्तारासाठी संभाव्य क्षेत्राचे भौगोलिक सर्वेक्षण (“Geospatial Mapping of Potential Zones for Expanding Responsible Aquaculture in Maharashtra.”) करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रकल्पांकरीता एकुण किंमत रु. 95.00 लक्ष इतकी असुन सदरचा प्रकल्प एकुण 3 वर्षात पुर्ण होणार आहे. सदरच्या प्रकल्पांकरीता अर्थ सहाय्य कांदळवन कक्ष, मुंबई यांच्या कडुन प्राप्त होणार असुन दि. 12 डिसेंबर 2023 रोजी उक्त नमुद प्रकल्पाकरीता एकुण रु. 95.00 लक्ष इतका निधी आयुक्त मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या खाती जमा करण्यात आला. उपलब्ध निधी मधुन सदरच्या प्रकल्पाकरीता आवश्यक प्रथम हप्त्याचा निधी रु. 45.00 लक्ष दि. 21/12/2023 रोजी व दुसरा हप्ता रु. 25.00 लक्ष माहे डिसेंबर 2024 असे एकुण रु. 70.00 लक्ष इतका निधी भा. कृ. अनु. पा. – केंद्रीय खारा जलजीव पालन अनुसंधान संस्थान, चेन्नई (CIBA, Chennai) यांच्या खाती वर्ग करण्यात आला आहे.
या प्रकल्पांतर्गत ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील खाड्यांचे व खाजण क्षेत्राचे सर्वेक्षण (Mapping) करण्यात आले असुन, या जिल्ह्यातील मत्स्य/ कोळंबी संवर्धनासाठी उपयुक्त व अनुत्पादित क्षेत्राचे सर्वेक्षण पुर्ण झाले आहे.
मौजे वाघेश्वर (उभादांडा) ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग येथे बहुप्रजातीय मत्स्यबीज उत्पादन केंद्राची उभारणी करणेबाबत:
- सद्यस्थितीत बहुप्रजातीय (खेकडा, जिताडा, शिपले/ कालव) बीजाची इतर राज्यातून आयात करावी लागत आहे. यास्तव महाराष्ट्र राज्यात या प्रजातींचे बीज उत्पादन होणे शक्य असल्याने महाराष्ट्र शासनाने मौजे वाघेश्वर (उभादांडा), ता. वेंगुर्ला येथे बहुप्रजातीय मत्स्यबीज उत्पादन केंद्र उभारणीकरीता शा. नि. क्रमांक मत्स्यवि -२०१७/ प्र.क्र.९०/पदुम-१३, दि. ०१/०३/२०१९ अन्वये मौजे वाघेश्वर (उमादांडा), ता. वेंगुर्ला येथील १.२५ हेक्टर जागेवर बहुप्रजातीय मत्स्यबीज उत्पादन केंद्र स्थापन करणेस मान्यता दिली आहे.
-
तपशिल खालील प्रमाणे:
- सुधारीत आराखड्यानुसार प्रथम टप्यात खेकडा व जिताडा मत्स्यबीज उत्पादन केंद्र उभारण्यात येणार असुन दुस-या टप्यात कालवे व काकई बीज उत्पादन केंद्र उभारण्यात येणार आहे. प्रस्तुत बहुप्रजातीय मत्स्यबीज उत्पादन केंद्राच्या (प्रथम टप्पा: खेकडा व जिताडा) उभारणीकरीता रु. 22.24 कोटी इतक्या निधीची अवश्यकता आहे. सदरचा निधी (रु. 22.24 कोटी) हा कांदळवन कक्षाकडुन उपलब्ध होणार आहे.
-
तपशिल खालील प्रमाणे:
- मौजे वाघेश्वर, ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग येथे बहुप्रजातीय मत्स्य बीज उत्पादन केंद्राची उभारणीकरीता प्रशासकीय मान्यते बाबत दि. 19/03/2025 रोजी मा. सचिव (पदुम) यांच्या अध्यक्षतेत बैठक घेण्यात आली. दि. 26/03/2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार उक्त नमुद मत्स्यबीज केंद्रास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
- मौजे वाघेश्वर, ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग येथे बहुप्रजातीय मत्स्य बीज उत्पादन केंद्राच्या उभारणीबाबतचा प्रस्ताव तटीय जलकृषी प्राधिकरण, चेन्नई यांना दि. 04/07/2025 रोजी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांच्या मार्फत सादर करण्यात आला आहे.
| अ.क्र. | संस्था | प्रकल्प | क्षमता | सलग्न शुल्क |
|---|---|---|---|---|
| 1 | राजीव गांधी मत्स्यपालन केंद्र (आरजीसीए) | खेकडा बीज उत्पादन केंद्र | 0.5 दशलक्ष इनस्टार (पिल्ले) प्रति वर्ष | 10,00,000/- |
| 2 | केंद्रीय खाऱ्या पाण्यातील मत्स्यपालन संस्था (सिबा) | जिताडा बीज उत्पादन केंद्र | 1.0 दशलक्ष लार्वी (पिल्ले) प्रति वर्ष | 6,00,000/- |
| 3 | केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्था (सीएमएफआरआय) | कालव व काकई बीज उत्पादन केंद्र | 5.0 दशलक्ष बीज प्रति वर्ष | 6,00,000/- |
| अ.क्र. | कामाचा तपशील | रक्कम (रुपयात) |
|---|---|---|
| 1 | स्थापत्य कामे | 15,36,58,150/- |
| 2 | विद्युत कामे | 3,27,92,785/- |
| 3 | उपकरणे (Equipments) | 1,46,27,206/- |
| 4 | FRP Tank काम | 1,16,84,754/- |
| 5 | सामग्री व प्रयोगशाळा उपकरणे (Accessories & Lab equipments) | 50,77,137/- |
| 6 | Pre-Operative खर्च | 45,51,000/- |
| एकूण | 22,23,91,032/- |