निळी थीम हिरवी थीम केशरी थीम | मानक प्रखरता तीव्र प्रखरता

मजकूर आकार

Current Size: 100%

भाषा

भारत सरकारचे अधिकृत पोर्टल

मत्स्यव्यवसाय विभाग

महाराष्ट्र शासन, भारत

भारत सरकारचे अधिकृत पोर्टल

भारत सरकारचे अधिकृत पोर्टल

तलाव ठेका धोरण

पाटबंधारे विभागांने बांधलेले तलाव मत्स्यव्यवसाय विकासासाठी मत्स्यव्यवसाय विभागाकडे हस्तांतरीत करण्याचे शासनाचे धोरण १९६६ पासून आमलात आहे. स्थानिक मच्छिमार सहकारी संस्थांमार्फत पाटाबंधारे तलावात मत्स्यसंवर्धन करुन जलक्षेत्राचा विकास करणे व मच्छिमारांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करुन देणे तसेच त्यांचा सामाजिक व आर्थिक दर्जा सुधारणे आणि स्थानिक लोकांना प्रथिन युक्त आहार उपलब्ध करुन देणे हा मुख्य उद्देश आहे. मत्स्यव्यवसाय विकसित करुन मच्छिमारांना रोजगार उपलबध्द करुन देणे हे शासनाचे धोरण आहे या अनुषंगाने पाटबंधारे विभागांने बांधलेले तलाव मत्स्यव्यवसाय विकासासाठी मत्स्यव्यवसाय विभागाकडे हस्तांतरीत करण्याचे धोरण खालिल आदेशांनुसार निश्चित करण्यात आले आहे.

  • शासन निर्णय ईरिगेशन ऑण्ड पॉवर डिपार्टमेंट क्र. एफ्‌आय्‌एस्‌/१०६३/७७१२-आय्‌(३), दि. २६.०४.१९६६.
  • शासन निर्णय कृषी व पदुम विभाग क्र. मत्स्यवि-१२९६/१४१८३/सीआर-१३२/पदुम-१३, दि. ०६.०४.२०००.
  • शासन निर्णय पाटाबंधार विभाग क्र. संकिर्ण-२००३/१३/(४००/०३)/जसंनी, दि. २०.०१.२००४.

२०० हेक्टर खालिल तलाव व जलाशयांचे मासेमारीचे हक्क स्थानिक मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना खालिल शासन निर्णय नुसार ५ वर्षासाठी ठेक्याने देण्यात येतात. मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांनी न घेतलेले तलाव जाहीर लिलावाने देण्यात येतात. तसेच २००१ नंतर तयार झालेले जलाशय हे दिनांक १५.१०.२००१ चे शासन निर्णयातील अट क्र. ११ नुसार जाहिर निविदेद्वारे ठेक्याने देण्यात येतात. याबाबतचे धोरण खालिल आदेशांनुसार निश्चित करण्यात आले आहे.

  • शासन निर्णय कृषी व पदुम विभाग क्र. मत्स्यवि-१२८९/३४७६५/सीआर-३४६/पदुम-१३, दि. २५.०२.१९९१.
  • शासन निर्णय कृषी व पदुम विभाग क्र. मत्स्यवि-११९९/२०/प्र.क्र.८/पदुम-१३, दि. १५.१०.२००१.
  • शासन निर्णय कृषी व पदुम विभाग क्र. मत्स्यवि-१२०१/प्र.क्र.२२४/पदुम-१३, दि. ०४.०१.२००२.
  • शासन निर्णय कृषी व पदुम विभाग क्र. मत्स्यवि-१२०२/१९४४२/प्र.क्र.१३०/पदुम-१३, दि. ०८.०८.२००२.
  • शासन निर्णय कृषी व पदुम विभाग क्र. मत्स्यवि-१२०३/प्र.क्र.२५/पदुम-१३, दि. १९.०७.२००३.
  • शासन निर्णय कृषी व पदुम विभाग क्र. मत्स्यवि-१२०४/प्र.क्र.३९/पदुम-१३, दि. ०३.०८.२००४.
  • शासन पत्र क्र. मत्स्यवि-२००४/प्र.क्र.१५९/पदुम-१३, दि. १४.०२.२००५.
  • शासन निर्णय कृषी व पदुम विभाग क्र. मत्स्यवि-१२०८/७१५५/प्र.क्र.७७/पदुम-१३, दि. १९.०६.२००८.

२०० हेक्टर खालिल तलाव व जलाशयांमधील मत्स्यबीज संचयन व न्युनतम तलाव ठेका रक्कम.

जलविस्तार हेक्टर इष्टतम संचयन न्युनतम तलाव ठेका रक्कम रू./हेक्टर
० ते २० ५००० प्रति हेक्टर. ३००/- प्रति हेक्टर.
२०.०१ ते ६० १.० लक्ष + २० हे. पुढील क्षेत्रासाठी २,००० प्रति हेक्टर. ६,०००/- + २० हे. पुढील क्षेत्रासाठी रू. १२०/- प्रति हेक्टर.
६०.०१ ते ३०० १.८ लक्ष + ६० हे. पुढील क्षेत्रासाठी १,००० प्रति हेक्टर. १०,८००/- + ६० हे. पुढील क्षेत्रासाठी रू. ६०/- प्रति हेक्टर.
३००.०१ ते १३०० ४.२ लक्ष + ३०० हे. पुढील क्षेत्रासाठी ५०० प्रति हेक्टर. २५,२००/- + ३०० हे. पुढील क्षेत्रासाठी रू. ३०/- प्रति हेक्टर.
१३००.०१ ते ५००० ९.२ लक्ष + १३०० हे. पुढील क्षेत्रासाठी ५०० प्रति हेक्टर. ५५,२००/- + १,३०० हे. पुढील क्षेत्रासाठी रू. २०/- प्रति हेक्टर.
५०००.०१ पेक्षा जास्त २७.७ लक्ष + ५००० हे. पुढील क्षेत्रासाठी ५०० प्रति हेक्टर. १,२९,२००/- + ५,००० हे. पुढील क्षेत्रासाठी रू. १०/- प्रति हेक्टर.