निळी थीम हिरवी थीम केशरी थीम | मानक प्रखरता तीव्र प्रखरता

मजकूर आकार

Current Size: 100%

भाषा

मत्स्यव्यवसाय विभाग

महाराष्ट्र शासन, भारत
भारत सरकारचे अधिकृत पोर्टल

मच्छिमारांना डिझेल तेलावरील मुल्यवर्धित कराची प्रतिपुर्ती

एप्रिल २००५ पासून मासेमारी नौकांसाठी वापरल्या जाणा¬या डिझेलवर मच्छिमारांना डिझेलतेलावर भराव्या लागलेल्या मुल्यवर्धित कराची (मुंबई परिक्षेत्रात ३५ % व मुंबई बाहेरील परिक्षेत्रासाठी ३१ %) प्रतिपूर्ती करण्यात येते.

मासेमारी नौकांसाठी डिझेल वापरची मर्यादा खालिल प्रमाणे आहे :-
मासेमारी नौका डिझेल वापरची मर्यादा - लिटर
प्रतिदीन वार्षिक
१ सिलेंडर १२ ३,६००.
२ सिलेंडर २० ६,०००.
३ सिलेंडर ३० ७,५००.
४ सिलेंडर ९६ २०,१६०.
६ सिलेंडर १७०-२३० ३५,७००.
निकष -
  • शासन पत्र क्रमांक मत्स्यवि-४६२५/(१३७)/पदुम-१४, दि. १४.०१.१९९७ अन्वये निर्धारित केलेल्या निकषा प्रमाणे डिझेल कोटा राहिल.
  • प्रत्येक महिन्यासाठी निश्चित करुन दिलेल्या सिलेंडर निहाय नौकांच्या डिझेल कोटा मंजूरीच्या निकषांच्या मर्यादेतच प्रतिपूर्तीची रक्कम अनुज्ञेय राहिल.
  • निश्चित केलेल्या निकषापेक्षा कमी डिझेल खरेदी केले असेल तर त्या महिन्याचा उर्वरीत कोटा व्यपगत होईल.
  • सदर योजना महाराष्ट्रात नोंदविलेल्या मच्छिमार सहकारी संस्थांच्या सभासदांकरिता अनूज्ञेय राहिल.
  • डिझेल कोटा उचलीकरिता विहित नमुन्यात डिझेल वितरण पुस्तीका ठेवावी लागेल.
  • लाभधारक सदस्यांना स्मार्ट कार्ड घेणे बंधन कारक राहिल.