मुख्य विषयाकडे जा| स्क्रीन वाचक प्रवेश
Weather Alert
Google Lens
Subscribe

राज्यस्तरीय

मच्छिमारांना डिझेल तेलावरील मुल्यवर्धित कराची प्रतिपुर्ती


एप्रिल २००५ पासून मासेमारी नौकांसाठी वापरल्या जाणा¬या डिझेलवर मच्छिमारांना डिझेलतेलावर भराव्या लागलेल्या मुल्यवर्धित कराची (मुंबई परिक्षेत्रात ३५ % व मुंबई बाहेरील परिक्षेत्रासाठी ३१ %) प्रतिपूर्ती करण्यात येते.
मासेमारी नौकांसाठी डिझेल वापरची मर्यादा खालिल प्रमाणे आहे :-

अधिक मच्छिमारांना डिझेल तेलावरील मुल्यवर्धित कराची प्रतिपुर्ती
नैसर्गिक आपत्तीत मृत पावलेल्या मच्छीमारांच्या वारसांना अनुदान :
मच्छिमारांस मासेमारी करतांना अपघाताने मृत्यू आल्यास किंवा तो बेपत्ता झाल्यास त्याच्या वारसांना मासेमार संकट निवारण निधीतून अर्थसहाय्य देण्याबाबतची योजना कृषी व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे शासन निर्णय क्र. मत्स्यम-११८९/सीआर-११७/ पदुम-१४, दि. ८ जून १९८९ पासून या विभागाकडून राबविण्यात येते. सध्या शासन निर्णय क्र. मत्स्यवि-१००६/७९ (१३)/पदुम-१४, दि. १ एप्रिल २००८ अन्वये रु. १,००,०००/- अर्थसहाय्य वारसदारास देण्यात येत आहे.
अर्थसहाय्य मंजूर करताना खालील प्रमुख अटी/शर्तीची पूर्तता करणे आवश्क आहे:
(१) अपघाताची नोंद पोलीस ठाण्यात होणे आवश्यक.
(२) संबधित ग्राम पंचायतीचे, सरपंच/पोलीस पाटील यांचे मृत मच्छिमारांबाबत मृत्यू तसेच वारस प्रमाणपत्र.
(३) जन्म-मृत्यू दाखला व शव विच्छेदन अहवाल
(४) संबंधित मत्स्य. सह. संस्थेचे क्रियाशील मच्छिमार असल्याचे प्रमाणपत्र.
  मच्छिमार मासेमारी करतांना वा तत्ससंबंधित इतर काम करतांना अपघाताने मृत्यू पावल्यास वा बेपत्ता झाल्यास संबंधित वारसास आयुक्त कार्यालयाकडे जिल्हा कार्यालयामार्फत अर्थसहाय्य मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रासह अर्ज करावा लागतो. आयुक्त कार्यालयाच्या मंजुरी आदेशानुसार संबंधित सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय कोषागारातून देयक पारीत करून, मंजूर रक्कम संबंधित वारसदारांस त्याच्या बँक खात्यात (डिबीटी द्वारे) जमा करतात.
Scroll to Top