मासळी उतरविण्याच्या केंद्र व मत्स्यबंदरांचा विकास कामांची टिप्पणी
महाराष्ट्र राज्याला 720 किमी लांबीचा सागरी किनारा लाभला असून सात सागरी जिल्हयात 3 मत्स्यबंदरे व 170 मासळी उतरविण्याची केंद्रांचा समावेश आहे. त्या 173 मासळी उतरविण्याच्या केंद्रापैकी 41 मासळी उतरविण्याच्या केंद्रावर मच्छिमारांना पायाभूत मुलभूत सुविधा केंद्र/राज्यशासना मार्फत पुरविण्यात आली आहेत. उर्वरित 7 नविन मत्स्यबंदरे, २ मत्स्यबंदरांचे आधुनिकीकरण, तसेच 29 मासळी उतरविण्याची कामे हाती घेणेत आली आहेत आणि नाबार्ड टप्पा २९ अंतर्गत 5 कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.
केंद्र/राज्य शासनामार्फत मच्छिमारांना बंदरे, जेट्टी व इतर मुलभूत सूविधा पुरविण्यासाठी खालील योजनेंतर्गत कामे हाती घेण्यात आली आहेत.
अ. नाबार्ड (RIDF)टप्पा-22 सदरच्या योजनेअंतर्गत रु. 63.16 कोटी इतक्या रक्कमेच्या एकुण 7 कामांना प्रशासकीय मान्यता शासन पत्र मत्स्यवि-2017/ प्र.क्र.45/ पदूम, दि. 23/02/2017 रोजी मिळालेली आहे. सदरचे कामांची कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालय, मुंबई काम करते. सद्यस्थितीत मंजूर ७ कामांपैकी पाचुबंदर, ता. वसई, जि. पालघर दिवाळे गाव, ता. बेलापूर,जि. ठाणे, बोर्ली मांडला, ता. मुरुड, जि. रायगड व बोऱ्या, ता. गुहागर, जि.रत्नागिरी ही 4 कामे पूर्ण झाली आहेत, विजयदुर्ग, ता. देवगड, जि. सिंधुदूर्ग हे काम प्रगतीपथावर आहे आणि चिंबई ता. अंधेरी जि. मुबई उपनगर येथील जेट्टी व रॅम्प(उतरता धक्का) चे काम पूर्ण झाल्यावर अंशत: रद्द करण्यात आले तर मेढा ता. मालवण जि.सिंधुदुर्ग हे काम पर्यावरण पूरक परवानग्या प्राप्त झाल्याने पूर्णत: रद्द करण्यात आले आहे.
ब.नाबार्ड (RIDF) टप्पा-23 सदरच्या योजनेंतर्गत रू. 51.37 कोटी इतक्या रक्कमेचे एकूण ५ कामांना प्रशासकिया मान्यता शासन निर्णय क्र. मत्स्यवि-1117/प्र.क.37/पदुम-14 दि.6/3/2018 रोजी प्राप्त झाली आहे. सदरचे कामांची कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालय, मुंबई काम करते. सद्यस्थितीत मंजूर कामांपैकी राजपुरी ता.मुरूड जि.रायगड हे काम पूर्ण झाले असून धाकटी डहाणू, ता. डहाणू, जि. पालघर, दिघी ता.श्रीवर्धन जि.रायगड, वेलदुर ता.गूहागर जि.रत्नागिरी ही ३ कामे प्रगतीपथावर आहेत. तर जुहु मोरगाव ता. अंधेरी जि. मुंबई उपनगर हे काम मिलिटरी वायरलेस सर्वेलंस प्रोटेक्टेड झोन क्षेत्रात येत असल्याने रद्द करण्यात आले आहे.
क.नाबार्ड (RIDF) टप्पा-24 सदरच्या योजनेंतर्गत रू. 79.21 कोटी इतक्या रक्कमेचे एकूण 2 कामांना प्रशासकिय मान्यता शासन निर्णय क्र. मत्स्यवि-1117/प्र.क.86/पदुम-14 दि.27/12/2018 रोजी प्राप्त झाली आहे. सदरचे कामांची कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालय, मुंबई काम करते. सद्यस्थितीत मंजूर कामांपैकी नांदगांव ता.मुरूड जि.रायगड हे काम पूर्ण झाले असून नवाबाग ता.वेंगुर्ला जि. सिंधुदूर्ग ही कामे प्रगतीपथावर आहेत.
- केंद्र पुरस्कृत योजना-
- नाबार्ड ग्रामीण पायाभूत विकास निधी योजना (RIDF)

- राष्ट्रीय कृषि विकास योजना सन 2016-17
- निलक्रांती योजना-
- मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील पायाभूत विकास निधी योजना (FIDF)
- प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना-
![]() अग्राव जि.रायगड |
![]() करंजा जि.रायगड |
![]() अलिबाग कोळीवाडा जि.रायगड |
![]() तारकर्ली जि.सिंधुदुर्ग |
![]() दिवाळेगाव जि.ठाणे |
![]() दिवाळेगाव जि.ठाणे |
![]() नांदगाव जि.रायगड |
![]() उत्तन पाटण आणि उत्तन भातोडी जि.ठाणे |
![]() मढ तळपशा जि.मुंबई उपनगर |
![]() मढ तळपशा जि.मुंबई उपनगर |
![]() राजपुरी जि.रायगड |
![]() राजपुरी जि.रायगड |