अ) भूजल :- या योजनेत मच्छिमार युवकांना गोडया पाण्यातील मत्स्यव्यवसायाच्या आधुनिक तंत्रज्ञानाचे लघु प्रशिक्षण देण्यात येते. विशेष केंद्रिय अर्थसहाय्यांतून ठाणे, रायगड, यवतमाळ व गडचिरोली जिल्ह्यातील आदिम जमातितील मच्छिमारांना प्रशिक्षण देण्यात येते.
प्रशिक्षणाचे ठिकाण – शासकिय मत्स्यबीज केंद्र.
प्रशिक्षण कालावधी – १ महिना.
प्रशिक्षण सत्रे – २ (प्रमुख कार्प प्रजनन हंगाम व सायप्रिनस प्रजनन हंगाम).
प्रशिक्षणार्थी क्षमता – २० प्रतिसत्र.
विद्यावेतन – रू. ३००/- अधिक जाण्यायेण्याचा प्रवासखर्च.प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर प्रमाणपत्र देण्यात येते.
पात्रता –
प्रशिक्षणार्थी क्रियाशील मच्छिमार असावा.
प्रशिक्षणार्थी १८ ते ३५ वयोगटातील असावा.
प्रशिक्षणार्थीने शाळा सोडल्याचा दाखला सादर करणे आवश्यक.
प्रशिक्षणार्थी किमान ४ थी पास असावा.
प्रशिक्षणार्थीस पोहता येणे आवश्यक.
ब) सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाला व परिचालन प्रशिक्षण कार्यक्रम :- यांत्रिकीकरणाद्वारे प्रगत मच्छिमारी तंत्राचा अवलंब करून मत्स्योत्पादन कसे वाढवावे याचे मच्छिमार युवकांना सर्वांगिण प्रशिक्षण देण्याचे उद्देशाने महाराष्ट शासनाने सातपाटी व वसई (ठाणे), वर्सोवा (मुंबई), आलिबाग (रायगड), रत्नागिरी (रत्नागिरी) व मालवण (सिंधुदूर्ग) येथे मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रे स्थापन केली आहेत.
प्रशिक्षण कालावधी – ६ महिने.
प्रशिक्षण सत्रे – २ (१ जा नेवारी ते ३० जुन व १ जुलै ते ३१ डिसेंबर).
प्रशिक्षार्थी क्षमता – २२ प्रतिसत्र
दारिद्रय रेषेखालील प्रशिक्षार्थीस दरमहा रू. १००/- प्रशिक्षण शुल्क.
दारिद्रय रेषेवरील प्रशिक्षार्थीस दरमहा रू. ४५०/- प्रशिक्षण शुल्क.
पात्रता –
प्रशिक्षणार्थी क्रियाशील मच्छिमार असावा.
प्रशिक्षणार्थीस मासेमारीचा किमान वर्षाचा अनुभव असावा.
प्रशिक्षणार्थी १८ ते ३५ वयोगटातील असावा.
प्रशिक्षणार्थीने शाळा सोडल्याचा दाखला सादर करणे आवश्यक.
प्रशिक्षणार्थी किमान ४ थी पास असावा.
प्रशिक्षणार्थीस पोहता येणे आवश्यक.
प्रशिक्षणार्थीस मच्छिमार सहकारी संस्थेची शिफारस आवश्यक.
क) प्रशिक्षण शुल्क आकारून घेण्यात येणारे प्रशिक्षणक्रम.
कृषि व पदुम विभागाचा शासन निर्णय क्र. मत्स्यआ/२००२/प्र.क्र.१०/पदुम-१२, दि. ३०.३.२००२ नुसार ९ विविध लघुप्रशिक्षण विभागामार्फत राबविण्यात येतात.
प्रशिक्षण | कालावधी (दिवस) | शुल्क (रू.) | प्रशिक्षार्थी क्षमता | सत्रे |
---|---|---|---|---|
मरिन डिझेल इंजिन व त्याची देखभाल | ३० | ७५०/- | २५ | २ |
नौकानयन शास्त्र | ३० | १,०००/- | २५ | २ |
सार्वजनिक मत्स्यालय व्यवस्थापन | १५ | २,०००/- | २० | २ |
मासेमारी नौकांवर संदेशवहन मत्स्यशोधन उपकरणांचा उपयोग | ५ | ५००/- | २५ | ५ |
गोडया पाण्यातील मिश्र मत्स्यशेती | १० | १,०००/- | २० | २ |
गोडया पाण्यातील कोळंबी संवर्धन | १० | १,०००/- | २० | २ |
प्रमुख कार्प मत्स्यबीज उत्पादन | १५ | १,०००/- | २० | २ |
जिताडा व तिलापिया | १० | १,०००/- | २० | २ |
शोभिवंत मत्स्यालयाचे व्यवस्थापन | ५ | २५०/- | १५ | ५ |