मुख्य विषयाकडे जा| स्क्रीन वाचक प्रवेश
Weather Alert
Google Lens
Subscribe

केंद्र शासन योजना

बिगर यांत्रिक नौकांना बाह्य व आंतर इंजिन बसविण्यासाठी अर्थसहाय्य केंद्र पुरस्कृत

पारंपारिक पद्घतीने मासेमारी करणारा लहान मच्छिमार आर्थिकदृष्ट्या कमकुवत असून अशा मच्छिमारांना समूद्रात ५ वाव खोलीपर्यंत मासेमारी सुलभतेने करण्यासाठी, मासेमारीसाठी जाण्यायेण्याचा वेळ व श्रम वाचून मासेमारीस अधिक वेळ मिळावा व पकडलेली मासळी त्वरीत किनार्यावर आणून त्यांचे उत्पन्नात वाढ व्हावी हा या योजनेचा उद्देश आहे.

मत्स्यसंवर्धक विकास यंत्रणांची स्थापना - ७५ टक्के केंद्र पुरस्कृत

गोडया पाण्यातील निवडक तलाव सघन मत्स्यसंवर्धनाखाली आणणे, मच्छिमारांना प्रशिक्षित करून मत्स्योत्पादन वाढविणे व मत्स्यसंवर्धनाच्या बाबींवर अर्थसहाय उपलब्ध करून देणे तसेच मत्स्योत्पादन ते मत्स्यविक्री यांत समन्वय साधणे या उद्देशाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये मत्स्यसंवर्धक विकास यंत्रणांचीस्थापना कण्यात आलेली आहे.

बाब दर परिमाण मर्यादा अभिप्राय
तलाव बांधकाम(भुजल) ६०,०००/- हेक्टर -
तलाव बांधकाम(भुजल) ७५,०००/- हेक्टर अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीस
तलाव बांधकाम(भुजल) ८०,०००/- हेक्टर डोगराळ क्षेत्रासाठी
तलाव बांधकाम(भुजल) १,००,०००/- हेक्टर डोगराळ क्षेत्रातील अनुसूचित जाती व जमातीस
तलावाचे नुतनिकरण १५,०००/- हेक्टर -
तलावाचे नुतनिकरण १८,०००/- हेक्टर अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीस
प्रथम वर्षासाठी निविष्ठा १०,०००/- हेक्टर -
प्रथम वर्षासाठी निविष्ठा १२,५००/- हेक्टर अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीस
गोड्या पाण्यातील मत्स्यबीज उबवणी केंद्र १,२०,०००/- संख्या १० दशलक्ष मत्सबीज प्रतिवर्ष क्षमतेच्या उबवणी केंद्रासाठी
गोड्या पाण्यातील मत्स्यबीज उबवणी केंद्र १,६०,०००/- संख्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीस
मत्स्यखाद्य प्रकल्प १,५०,०००/- संख्या -
गोड्या पाण्यातील लहान कोळंबी बीज उबवणी केंद्र २,४०,०००/ संख्या ५ ते १० दशलक्ष कोळंबी बीज प्रतिवर्ष क्षमतेच्या उबवणी केंद्रासाठी
शोभिवंत माशांसाठी उबवणी केंद्रासह एकात्मिक प्रकल्प उभारणी १,५०,०००/- संख्या -

निमखारे पाण्यांतील मत्स्यसंवर्धक विकास यंत्रणांची स्थापना - ७५ टक्के केंद्र पुरस्कृत

निमखारे पाण्याखालिल क्षेत्र विकसित करुन निमखारे पाण्याखालिल तलाव सघन मत्स्यसंवर्धनाखाली आणणे, मच्छिमारांना प्रशिक्षित करून मत्स्योत्पादन वाढविणे व मत्स्यसंवर्धनाच्या बाबींवर अर्थसहाय उपलब्ध करून देणे तसेच मत्स्योत्पादन ते मत्स्यविक्री यांत समन्वय साधणे या उद्देशाने प्रत्येक सागरी जिल्ह्यामध्ये निमखारे पाण्यांतील मत्स्यसंवर्धक विकास यंत्रणांची स्थापना कण्यात आलेली आहे. यंत्रणेमार्फत कोळंबी संवर्धकांना जागेची निवड करण्यासाठी प्रत्यक्ष प्रशिक्षण मेळावे, चर्चासत्राद्वारे प्रगत तंत्र सामान्य लाभार्थी पर्यंत पोचविण्याचे कार्य केले जाते. तसेच कोळंबी संवर्धन प्रकल्पासाठी बँकेकडून कर्ज मिळविण्यासठी शिफारस केली जाते.

सागरी जिल्ह्यामध्ये प्रस्तुत यंत्रणेमार्फतच मत्स्यसंवर्धक विकास यंत्रणे मार्फत राबविण्यात येणारे भुजल क्षेत्रासाठीचे कार्यक्रम राबविण्यात येतात. या यंत्रणांचे अध्यक्ष संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व सदस्य सचिव संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय हे असता.

बाब दर परिमाण मर्यादा अभिप्राय
तलाव बांधकाम (निमखारे) ६०,०००/- हेक्टर -
तलाव बांधकाम (निमखारे) ७५,०००/- हेक्टर अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीस
तलावाचे नुतनिकरण १५,०००/- हेक्टर -
तलावाचे नुतनिकरण १८,०००/- हेक्टर अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीस

मच्छिमारांचे विकासाकरिता डिझेल तेलावर सवलत - १०० टक्के केंद्र पुरस्कृत

मासेमारी नौकांसाठी वापरल्या जाणा-या डिझेलकरिता मच्छिमारांना रु. १.५० प्रती लिटर सवलत केंद्र शासना मार्फत दिली जाते.

मासेमारी नौकांसाठी वापरल्या जाणा-या डिझेलकरिता मच्छिमारांना रु. १.५० प्रती लिटर सवलत केंद्र शासना मार्फत दिली जाते.

मासेमारी नौका डिझेल वापरची मर्यादा - लिटर
प्रतिदीन वार्षिक
१ सिलेंडर १२ ३,६००
२ सिलेंडर २० ६,०००
३ सिलेंडर ३० ७,५००
४ सिलेंडर ९६ २०,१६०
६ सिलेंडर १७०-२३० ३५,७००

निकष -

लाभधारक दारिद्र्य रेषेखालिल असावा.
सागरी मासेमारी कायद्याचे पालन करणा-या मासेमारी नौका सदर लाभ मिळण्यास पात्र असतील.
मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करणा-या मासेमारी नौका सदर लाभ मिळण्यास अपात्र असतील.
नउव्या पंचवार्षिक योजने पर्यंत बांधलेल्या व २० मिटर पेक्षा कमी लांब असलेल्या मासेमारी नौका लाभास पात्र असतील..
सदर नौकेची मासेमारी नौका म्हणुन नोंद्णी झालेली असावी.
मत्स्यव्यवसाय विभागाने मान्यता दिलेल्या डिझेल पंपावरुनच डिझेल खरेदी केलेले असावे.
अनुदानाची रक्कम नौका मालकाचे (गट प्रमुखाचे) खात्यावर जमा केली जाईल.
Scroll to Top