निळी थीम हिरवी थीम केशरी थीम | मानक प्रखरता तीव्र प्रखरता

मजकूर आकार

Current Size: 100%

भाषा

मत्स्यव्यवसाय विभाग

महाराष्ट्र शासन, भारत
भारत सरकारचे अधिकृत पोर्टल

मत्स्यसंवर्धक विकास यंत्रणांची स्थापना - ७५ टक्के केंद्र पुरस्कृत

गोडया पाण्यातील निवडक तलाव सघन मत्स्यसंवर्धनाखाली आणणे, मच्छिमारांना प्रशिक्षित करून मत्स्योत्पादन वाढविणे व मत्स्यसंवर्धनाच्या बाबींवर अर्थसहाय उपलब्ध करून देणे तसेच मत्स्योत्पादन ते मत्स्यविक्री यांत समन्वय साधणे या उद्देशाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये मत्स्यसंवर्धक विकास यंत्रणांचीस्थापना कण्यात आलेली आहे.

या यंत्रणांचे अध्यक्ष संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व सदस्य सचिव संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय हे असतात.

मत्स्यसंवर्धन विकास यंत्रणेमार्फत राबविण्यात येणा-या योजना.
बाब दर परिमाण मर्यादा अभिप्राय
तलाव बांधकाम(भुजल) ६०,०००/- हेक्टर -
तलाव बांधकाम(भुजल) ७५,०००/- हेक्टर अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीस
तलाव बांधकाम(भुजल) ८०,०००/- हेक्टर डोगराळ क्षेत्रासाठी
तलाव बांधकाम(भुजल) १,००,०००/- हेक्टर डोगराळ क्षेत्रातील अनुसूचित जाती व जमातीस
तलावाचे नुतनिकरण १५,०००/- हेक्टर -
तलावाचे नुतनिकरण १८,०००/- हेक्टर अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीस
प्रथम वर्षासाठी निविष्ठा १०,०००/- हेक्टर -
प्रथम वर्षासाठी निविष्ठा १२,५००/- हेक्टर अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीस
गोड्या पाण्यातील मत्स्यबीज उबवणी केंद्र १,२०,०००/- संख्या १० दशलक्ष मत्सबीज प्रतिवर्ष क्षमतेच्या उबवणी केंद्रासाठी
गोड्या पाण्यातील मत्स्यबीज उबवणी केंद्र १,६०,०००/- संख्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीस
मत्स्यखाद्य प्रकल्प १,५०,०००/- संख्या -
गोड्या पाण्यातील लहान कोळंबी बीज उबवणी केंद्र २,४०,०००/ संख्या ५ ते १० दशलक्ष कोळंबी बीज प्रतिवर्ष क्षमतेच्या उबवणी केंद्रासाठी
शोभिवंत माशांसाठी उबवणी केंद्रासह एकात्मिक प्रकल्प उभारणी १,५०,०००/- संख्या -