महाराष्ट्र शासन मत्स्यव्यवसाय विभाग

रा स वि नि पुरुस्कृत योजना

योजनेचे नाव : ग्रामपंचायतींच्या रस्त्यांवर सौर ऊर्जा पथ दिवे उभारणे.

योजनेचे स्वरूप : राज्य पुरस्कृत

योजनेबाबतचा तपशील :

राज्यातील विजेची मागणी व पुरवठा यामधील तफावत पाहता अपारंपारिक उर्जेचा वापर करणे योग्य होणार असून राज्यातील ग्रामीण भागात सध्याचा विजेचा पुरवठा लक्षात घेता, ग्रामीण भागात पर्यावरण संतुलन प्रणित मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने अपारंपारिक स्त्रोतातून निर्मित विजेचा पुरवठा व्हावा या उद्देशाने ग्रामीण भागातील रस्त्यांवर सौर पथ दिवे खांब (Solar street light) उभारण्याची योजना सन 2010-2011 पासुन कार्यान्वित केली आहे. ही योजना राज्य शासन, केंद्र शासन व ग्रामपंचायतींच्या सहभागातून राबवावयाची आहे.

सौर उर्जा पथदिवे उभारणीकरीता प्रत्येक जिल्हयासाठी महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरणाच्या दर करारपत्रकामध्ये समावेश असलेल्या एजन्सींची निवड केली जाते व जिल्हयांना ठरवून दिलेले उद्दिष्ट या एजन्सींकडून पूर्ण करून घेण्यात येते. त्यामध्ये संबंधीत उत्पादकाला पुरवठा, उभारणी, कार्यान्वयन व 5 वर्षांसाठी देखभाल दुरुस्तीच्या अटींचा समावेश आहे. त्यानुसार जिल्हा परिषदांमार्फत या सर्व अटी विचारात घेऊन संबंधीत ग्रामपंचायतींच्या रस्त्यांवर सौर पथदिव्यांची उभारणी केली जाते.

 
(रुपये लाखात)
अ.क्र. वर्ष अर्थसंकल्पिय तरतूद विभागाने जिल्हापरिषदांना वितरीत केलेले अनुदान
1 2010-11 900.00 900.00
2 2011-12 1000.00 850.00
3 2012-13 1000.00 800.00