You are here
मत्स्यव्यवसाय विभाग
- अधिनियम व नियम
- शासन निर्णय व परिपत्रक
- मत्स्योत्पादनाचा अहवाल
- मत्स्यव्यवसाय सुविधांची माहिती
- अर्थसंकल्प
- वार्षिक अहवाल
- विषेश अर्थसहाय्य
- माहिती अधिकार
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम
- कर्ज आणि वसुली
- मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था
- मत्स्यबोटूकली अहवाल
- नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन
- लोक सहभाग (सहकार जाळे)
- मत्स्योद्योग विकास महामंडळ
- शासकीय कर्मचा-यांकरीता
- महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमन 1981 कायद्यांतर्गत अनधिकृत नौकांवर केलेल्या कार्यवाहीचा तपशिल
- विभागाच्या जागा
रा स वि नि पुरुस्कृत योजना
योजनेचे नाव : ग्रामपंचायतींच्या रस्त्यांवर सौर ऊर्जा पथ दिवे उभारणे.
योजनेचे स्वरूप : राज्य पुरस्कृत
योजनेबाबतचा तपशील :
राज्यातील विजेची मागणी व पुरवठा यामधील तफावत पाहता अपारंपारिक उर्जेचा वापर करणे योग्य होणार असून राज्यातील ग्रामीण भागात सध्याचा विजेचा पुरवठा लक्षात घेता, ग्रामीण भागात पर्यावरण संतुलन प्रणित मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने अपारंपारिक स्त्रोतातून निर्मित विजेचा पुरवठा व्हावा या उद्देशाने ग्रामीण भागातील रस्त्यांवर सौर पथ दिवे खांब (Solar street light) उभारण्याची योजना सन 2010-2011 पासुन कार्यान्वित केली आहे. ही योजना राज्य शासन, केंद्र शासन व ग्रामपंचायतींच्या सहभागातून राबवावयाची आहे.
सौर उर्जा पथदिवे उभारणीकरीता प्रत्येक जिल्हयासाठी महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरणाच्या दर करारपत्रकामध्ये समावेश असलेल्या एजन्सींची निवड केली जाते व जिल्हयांना ठरवून दिलेले उद्दिष्ट या एजन्सींकडून पूर्ण करून घेण्यात येते. त्यामध्ये संबंधीत उत्पादकाला पुरवठा, उभारणी, कार्यान्वयन व 5 वर्षांसाठी देखभाल दुरुस्तीच्या अटींचा समावेश आहे. त्यानुसार जिल्हा परिषदांमार्फत या सर्व अटी विचारात घेऊन संबंधीत ग्रामपंचायतींच्या रस्त्यांवर सौर पथदिव्यांची उभारणी केली जाते.
अ.क्र. | वर्ष | अर्थसंकल्पिय तरतूद | विभागाने जिल्हापरिषदांना वितरीत केलेले अनुदान |
---|---|---|---|
१ | २०१०-११ | ९००.०० | ९००.०० |
२ | २०११-१२ | १०००.०० | ८५०.०० |
३ | २०१२-१३ | १०००.०० | ८००.०० |