अ) सागरी मत्स्यव्यवसाय ६ महिन्याचा प्रशिक्षण कार्यक्रम :- नौकांचे यांत्रिकीकरणाद्वारे प्रगत मच्छिमारी तंत्राचा अवलंब करून सागरी मत्स्योत्पादन कसे वाढवावे याचे मच्छिमार युवकांना सर्वांगिण प्रशिक्षण देण्याचे उद्देशाने महाराष्ट शासनाने सातपाटी व वसई (ठाणे), वर्सोवा (मुंबई), आलिबाग (रायगड), रत्नागिरी (रत्नागिरी) व मालवण (सिंधुदूर्ग) येथे मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रे स्थापन केली आहेत. या केंन्द्रात सागरी मत्सव्यवसाय नौकानयन, सागरीमासेमारीपध्दती, नौका इंजिनाची देखभाल व परिरक्षण इ. बाबतचे प्रशिक्षण देण्यात येते.
- प्रशिक्षण कालावधी - ६ महिने.
- प्रशिक्षण सत्रे - २ सत्रे (१ जानेवारी ते ३० जुन व १ जुलै ते ३१ डिसेंबर).
- प्रशिक्षणार्थी क्षमता - २२ प्रशिक्षणार्थी प्रति सत्र प्रशिक्षणार्थी
- प्रशिक्षणार्थी शुल्क - दारिद्रय रेषेखालील प्रशिक्षणार्थीस दरमहा रू. १००/-
दारिद्रय रेषेवरील प्रशिक्षणार्थीस दरमहा रू. ४५०/-
पात्रता -
- प्रशिक्षणार्थी क्रियाशील मच्छिमार असावा.
- प्रशिक्षणार्थीस मासेमारीचा किमान वर्षाचा अनुभव असावा.
- प्रशिक्षणार्थी १८ ते ३५ वयोगटातील असावा.
- प्रशिक्षणार्थीने शाळा सोडल्याचा दाखला सादर करणे आवश्यक.
- प्रशिक्षणार्थी किमान ४ थी पास असावा व लिहिता वाचता येणे आवश्यक.
- प्रशिक्षणार्थीस पोहता येणे आवश्यक.
- प्रशिक्षणार्थीस मच्छिमार सहकारी संस्थेची शिफारस आवश्यक.
ब) प्रशिक्षण शुल्क आकारून घेण्यात येणारे प्रशिक्षणक्रम. (लघु प्रशिक्षण कार्यक्रम) :- कृषि व पदुम विभागाचा शासन निर्णय क्र. मत्स्यआ/२००२/प्र.क्र.१०/पदुम-१२, दि. ३०.३.२००२ नुसार ९ विविध मत्स्यव्यवसाय लघुप्रशिक्षण विभागामार्फत राबविण्यात येतात. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे. ठिकाण, प्रशिक्षण शुल्क प्रशिक्षण कालावधी या बाबतची माहिती खालील प्रमाणे आहे.